Sun, May 26, 2019 08:52होमपेज › Satara › पगार थकवले; ‘श्रीराम’चे माजी कामगार पोलिस ठाण्यात (video)

पगार थकवले; ‘श्रीराम’चे माजी कामगार पोलिस ठाण्यात (video)

Published On: Jan 26 2018 12:32PM | Last Updated: Jan 26 2018 12:54PMफलटण : प्रतिनिधी

गेली 6 ते 7 वर्षा पासुन श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळा विभाग येथुन निवृत्त झालेल्या कामगारांचे थकीत पगार आणि इतर येणे देण्यात आले नाही. याच पार्श्वभूमीवर कामगार प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी रोजी अधिकार गृहासमोर आमराण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात काँग्रेस व भाजपने उडी घेतली आहे. सांबांधित कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असून तणावाचे वातावरण आहे.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,श्रीराम सहकारी कारखान्यात ३१ मे २०११ पासून निवृत्त झालेल्या150 हुन अधिक कामगाराचे काही महीन्यांचे पगार व निवृत्ती नंतरची मिळणारी रक्कम गेल्या 6 वर्षापासून वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही मिळत नाही यामुळे दैनंदीन जीवनामध्ये कामगारांना अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे यामुळे कौंटुबीक अडचणी वाढत चालल्या असल्याने निवृत्त कामगार वैयक्तीक व सामुहीकपणे अनेक वेळा चेअरमन व कार्यकारी व्यवस्थापक यांना भेटुनही आज उद्या असे हेलपाटे मारायला लागत असल्याने आमरण उपोषणास बसले असून त्या सर्वांनी कारखाना प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.