होमपेज › Satara › खटाव : धोंडेवाडीतील अपघातात श्रीराम महाराजांचा मृत्यू

खटाव : धोंडेवाडीतील अपघातात श्रीराम महाराजांचा मृत्यू

Published On: Jan 19 2018 3:24PM | Last Updated: Jan 19 2018 3:24PMकातरखटाव : वार्ताहर

(ता. माण) येथील व सध्या बडवाह येथील खेडीघाटमधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे संस्थापक श्रीराम महाराज रामदासी हे धोंडेवाडी (ता. खटाव) येथील अपघातात ठार झाले. 

मध्य प्रदेश व देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे हजारो अनुयायी आहेत.  श्रीराम महाराजांचे काही शिष्य त्यांच्या स्कॉर्पिओमध्ये होते. धोंडेवाडी, ता. खटाव येथे नवीन महावितरण उपकेंद्रानजीक  टँकरला ओव्हरटेक करून पुढे जाताना चालकाचे स्कॉर्पिओ क्रमांक- एम.एच. 13 सीयू 1313 वरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याने स्कॉर्पिओतील तीन पुरुष व एक महिला जबर जखमी झाले. यातील   श्री राम महाराज रामदासी  यांची  प्रकृती चिंताजनक होती. त्यांना  व इतर जखमींना तातडीने सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

रात्री उशीरा शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मध्यप्रदेशमधील बडवाह या गावी नेण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अपघाताच्या अधिक तपासासाठी  वडूज पोलिस ठाण्याकडे  गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.