Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Satara › वसंतदादा पाटील म्हणजे सर्वसामान्यांचा आधार : श्रीनिवास पाटील

वसंतदादा पाटील म्हणजे सर्वसामान्यांचा आधार : श्रीनिवास पाटील

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:14AM

बुकमार्क करा
कोरेगाव : प्रतिनिधी

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्व. वसंतदादा पाटील यांनी शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, सहकार यासह विविध क्षेत्रामध्ये क्रांती केली. जनतेची नाडी ओळखणारा, सर्वसामान्य माणसांना आधार देणारा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा माणसांच्या गर्दीतील माणूस म्हणजे डॉ. वसंतदादा पाटील, असे गौरवोद्गार सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.

रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या सांगता सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब पाटील होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील,  जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष बेदील माने आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्रीनिवास पाटील म्हणाले की, स्व. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर, यशवंतराव मोहिते, हे स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, आंदोलने केली व प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यसैनिक, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिका दादांनी समर्थपणे पार पाडल्या. पाणी आडवा, पाणी जिरवा ही त्यांची घोषणा सर्वश्रेष्ठ ठरली यातूनच महाराष्ट्राचा कायापालट झाला. 

आ. बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक सुनील माने यांनी केले.