Fri, Nov 16, 2018 11:10होमपेज › Satara › पुणे-बंगळुरु महामार्गावर शिवशाही बस पलटी 

पुणे-बंगळुरु महामार्गावर शिवशाही बस पलटी 

Published On: Jul 25 2018 9:48AM | Last Updated: Jul 25 2018 9:48AMसातारा : प्रतिनिधी

पुणे-बंगळुरु महामार्गावरील भरतगाव (ता. सातारा) येथे पुणेहुन चिपळूणला जाणारी शिवशाही बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

शिवशाही बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. बसमधील जखमी प्रवाशांना स्‍थानिकांनी जवळच्या रुग्‍णालयात दाखल केले आहे.

दरम्‍यान, घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस घटनास्थळी  दाखल झाले आहेत.