Sun, Nov 18, 2018 08:04होमपेज › Satara › 'शिवप्रतापदिनी' प्रतापगडावर उत्‍साह(व्‍हिडिओ) 

'शिवप्रतापदिनी' प्रतापगडावर उत्‍साह(व्‍हिडिओ) 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : पुढारी ऑनलाईन

आज शिवप्रताप दिन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा सांगणारा हा दिवस. यानिमित्त प्रतापगडावर जनसागल लोटला आहे. प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्‍तांचा उत्‍साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. 

प्रशासनाच्या वतीनेही शिवप्रताप दिनाची तयारी करण्यात आली आहे. सातारच्या जिल्‍हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्‍ते गडावरील भवानी मातेची महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर मुख्य सोहळा सुरू झाला असून गडावर राज्यभरातून शिवप्रेमी येत आहेत.