फलटण : प्रतिनिधी
साखरवाडी, ता. फलटण येथील डी. के. पवार यांचे कार्य कौतुकास पात्र आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे म्हणजेच महानंदचे व्हाईस चेअरमन डी. के. पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
दूध प्रश्नासंबधी राज्यातील दूध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर पवार यांचा शुक्रवारी वाढदिवस असल्याचे खा. पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर खा. पवार यांनी डी. के. पवार यांचे महानंदमधील कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत शाब्बासकीची थाप दिली. वाढदिवस जरी शुक्रवारी असला तरी गुरूवारीच खा. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्यास चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी महानंदच्या डी. के. पवार यांच्यासह सर्वच संचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.
यावेळी राजारामबापू दूध संघाचेे विनायक डी. पाटील, पुणे जिल्हा दूध संघाचे गोपाळराव म्हस्के, संगमनेर दूध संघाचे रणजितसिंह देशमुख, ऊर्जा दूधचे प्रकाश कुतवळ, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, माजी चेअरमन सतिशराव तावरे, पुणे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक विवेश क्षीरसागर, राजारामबापू दूध संघाचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.