होमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार

मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : पुढारी ऑनलाईन

आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्याने कराडमधील प्रीतिसंगमावर राज्यातील नेत्यांची मांदियाळी आहे. या ठिकाणीही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम हे सरकार करतेय, असे आपल्या भाषणात म्हटले होते. त्याला आपल्या खास शैलीत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद असल्याचे टीकास्त्र शरद पवारांनी सोडले. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी कराडातील प्रीतिसंगम या स्मृतीस्थळावर जाऊन यशवंतरावांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार त्या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे इतर नेतेही होते. 

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजपासून सरकारविरोधात राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून या आंदोलनास सुरूवात करण्यात आली.