Tue, Feb 18, 2020 01:17होमपेज › Satara › उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक न लढविण्यावर ठाम : शरद पवार 

उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक न लढविण्यावर ठाम : शरद पवार 

Published On: Sep 28 2019 1:27AM | Last Updated: Sep 27 2019 11:29PM
पुणे : प्रतिनिधी 

सातारा लोकसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत भाजपचे संभाव्य उमेदवार असलेले उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले. 

कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी मी  निवडणूक न लढविण्यावर ठाम आहे, असे ते म्हणाले. उदयनराजे यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील आणि सुनील माने यांची नावे चर्चेत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल,फफ अशी माहितीही यावेळी पवारांनी दिली.  सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात मी लढावे, अशी जरी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी मी निवडणूक न लढविण्यावर ठाम आहे, असे  पवार म्हणाले.

उदयनराजे दिवसा माझ्याकडे राहू शकतात  ः  सातार्‍याचे  खासदार उदयनराजे हे माझ्याबदद्ल आस्था दाखवित असले तरी त्यात मला अधिक भर घालायची नाही. त्यांनी दिल्लीतील माझा बंगला आणि गाडी मागितली आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ असेपर्यंत फक्त दिवसा ते माझ्याकडे येऊन राहू शकतात.