होमपेज › Satara › हम तुम एक कमरे मे बंद हो और...

हम तुम एक कमरे मे बंद हो और...

Published On: May 09 2018 12:11PM | Last Updated: May 09 2018 12:18PMसातारा : प्रतिनिधी

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शरद पवार बुधवारी साताऱ्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी १०.३० ला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार आणि पत्रकार कॉन्फरन्स हॉलमध्ये आल्यानंतर कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा अचानक बंद झाला. ११ वाजण्याच्या दरम्यान पवार पत्रकार परिषद झाल्यानंतर बाहेर निघाले असता असता दरवाजा लॉक झाल्याचे समजले. दरवाजा उघडण्यासाठी आमदार आणि कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र दरवाजा काही केल्या उघडला नाही. 

शेवटी अर्धा तास प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याचे पाहून हा दरवाजा तोडण्यात आला. तेवढा वेळ शरद पवार आणि पत्रकार हॉलमध्ये बसून होते. त्यावेळी शरद पवार यांनी 'हम तुम एक कमरे मे बंद हो और चावी खो जाये' गाणे म्हटले. पवार यांच्या या अंदाजामुळे सर्वजणच अवाक झाले. दरवाजा बंद झाल्यामुळे वेळ होत असला तरी याचा कोणताही राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, उलट ते नेहमीच्या शैलीत निवांत बसले होते. त्यावेळी त्यांनी  काही चुटकुले सांगितल्याने पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला होता.

 

Tags : sharad pawar, reporters, locked, press conference hall, hum tum ek kamare me band ho