Thu, Apr 25, 2019 17:51होमपेज › Satara › डोंगरझाडीत युवक युवतींचे अश्‍लील चाळे 

डोंगरझाडीत युवक युवतींचे अश्‍लील चाळे 

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 10:51PMचाफळ : वार्ताहर 

चाफळ परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील घनदाट झाडीमध्ये बसून अश्‍लिल चाळे करणार्‍या सात प्रेमी युगलांना वनकर्मचारी यांनी पकडून पालकांच्याकडे स्वाधीन केले. काहीना समज देवून सोडण्यात आले. शामगांव, उंब्रज, मसूर, कराड, पाटण येथील कॉलेज व हायस्कूलमधील हे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.  

आपली मुलगी कॉलेजला गेल्यानंतर ती अन्य कोठे जाते का यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे, असे मत वनक्षेत्रपाल अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. डोंगराना आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आगी पासून डोंगरांचा बचाव व्हावा, म्हणून जागो जागी गवत कापण्याचे काम चालू आहे. आगीपासून वन्य प्राण्यांचा बचाव व्हावा म्हणून वनविभागाच्या वतीने सर्वे सुरू आहे. यावेळी पाडळोशी परिसरातील नारळवाडी, धायटी, मसूगडेवाडी येथे झाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले सात प्रेमीयुगूल वनकर्मचार्‍यांना निदर्शनास आले.

कर्मचार्‍यांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. प्रेमी युगुलांची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी ते कॉलेज व हायस्कूलचे विद्यार्थी असल्याचे समोर आले. काहींच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. चाफळ परिसर हा निसर्गरम्य असल्याने अनेक भागातून या परिसरात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी येत असतात. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याने ते बिनधास्त घनदाट झाडीमध्ये जाऊन अश्‍लील चाळे करत असतात. पोलिसांनी अशा प्रेमी युगुलांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.