Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Satara › सातार्‍यात अडीच किलो गांजा जप्‍त

सातार्‍यात अडीच किलो गांजा जप्‍त

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 11:32PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरात अवैधरीत्या  तब्बल अडीच किलो गांजा विक्रीसाठी घेवून फिरणार्‍या नाना महादेव मसुगडे (वय 50, रा. मिल्ट्री अपशिंगे ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. संशयिताने पंढरपूर येथून गांजा आणला असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली आहे.

याबाबत एलसीबीने दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी एलसीबीचे पोलिस गस्त घालत होते. कोरेगाव रस्त्यावर पोलिस असताना त्यांना एमएच 11 सीएल 8975 या दुचाकीवर एकजण संशयितरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता नाना मसुगडे असे सांगितले. पोलिस असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला पकडून ठेवले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवी पाहिली असता त्यामध्ये गांजा होता.

एलसीबीच्या पथकाने संशयित नाना मसुगडे याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथून गांजा आणला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी गांजा जप्‍त केला असता तो 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा होता. याशिवाय दुचाकी व मोबाईल असा एकूण 33 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, विजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मोहसीन मोमीन, संजय जाधव यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.