Sat, Nov 17, 2018 12:15होमपेज › Satara › गोडोलीत घरात घुसून वार

गोडोलीत घरात घुसून वार

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

अजिंक्यतारा रस्त्यावरील गोडोली येथे धारदार कोयत्याने घरात घुसून युवकावर वार केले. या घटनेने परिसर हादरला असून, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून हा हल्‍ला झाला आहे. दरम्यान, संबंधित युवकाच्या आईलाही धक्‍काबुक्‍की झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

राजू मोरे, रोहित जाधव, अनोळखी दोघे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गंभीर हल्‍ला केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अर्जुन विश्‍वनाथ शिंदे (वय 21, रा. गोडोली) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तो व त्यांची आई दोघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अर्जुन शिंदे हा युवक घरी असताना संशयित चौघे घरात घुसले व अर्जुन याला मारहाण करु लागले. सुमारे एक महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून हल्‍ला चढवल्यानंतर अर्जुनच्या आईने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्‍काबुकी झाली. ही सर्व घटना सुरु असताना परिसरातील नागरिक जमू लागले. मारहाण सुरु असताना संशयित एकाने धारदार शस्त्राने अर्जुनवर हल्‍ला केला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरुन पसार झाले.

घरात घुसून वार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत अर्जुन याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे. दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.