Sat, Jun 06, 2020 01:34होमपेज › Satara › हजारो विद्यार्थिनींकडून अनोख्या पध्दतीने 'नारीशक्ती'चा जागर(Video)

हजारो विद्यार्थिनींकडून अनोख्या पध्दतीने 'नारीशक्ती'चा जागर(Video)

Published On: Mar 07 2019 1:26PM | Last Updated: Mar 07 2019 1:38PM
 कराड : प्रतिनिधी

जागतिक महिला दिन उद्‍या शुक्रवारी मोठ्‍या उत्‍साहात साजरा होत आहे. त्‍या पार्श्वभूमिवर सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरूवारी कराड येथील रामविलास किसनलाल लाहोटी कन्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील सुमारे ११८० विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत "नारीशक्ती" चा अनोख्या पध्दतीने जागर केला.

यावेळी शाळेच्या तब्‍बल ११८० विद्यार्थिनींनी शाळेच्या क्रिडांगणावर "नारीशक्ती" या शब्‍दांच्या आकाराप्रमाणे रांगेत उभे राहून "नारीशक्ती" अशी  अक्षरे  रेखाटली.

विद्यार्थिनींनी कल्‍पकतेने केलेल्‍या या अविष्‍काराने उपस्थितांची मने जिंकली. क्रीडा शिक्षक महेंद्र भोसले आणि मुख्याध्यापिका शर्मीला बायस यांच्यासह शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या इमारतीमधून विद्यार्थिनींचा हा अनोखा कलाविष्‍कार चित्रित करण्यात आला असून, हा व्हीडीओ सामाजिक माध्यमातून व्हायरल होत आहे.