होमपेज › Satara › सातारा : शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला

सातारा : शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला

Published On: Dec 27 2017 9:32PM | Last Updated: Dec 27 2017 9:32PM

बुकमार्क करा
कोडोली : वार्ताहर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील नव्याने उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाला बुधवारी सायंकाळी ७ वाजता भगदाड पडू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रस्त्याने ती वळवण्यात आली.