सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. गुरव यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार शिक्षकाला फरक बिल मंजूर करायचे होते. यासाठी ते शिक्षक पुनिता गुरव यांना भेटले. संबंधित कामासाठी गुरव यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार शिक्षकाने एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी सोमवारी सांयकाळी सापळा रचला आणि दहा हजार रूपयांची लाच घेताना गुरुव यांना रंगेहाथ पकडले.
Tags : satara zp officer, bribe, crime