Thu, Apr 25, 2019 03:39होमपेज › Satara › शहरातून झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या गायब

शहरातून झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या गायब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी  

सातारा शहरातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, सिग्नलवर असणार्‍या पांढर्‍या पट्ट्या तसेच रस्त्याच्या कडेला असणार्‍या पट्ट्या गायब होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत होत असून याची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील वाहतुकीचे वारंवार तीन-तेरा वाजत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

सध्या पोवई नाका व जिल्हा परिषदेच्या चौकात सिग्नल आहेत. जिल्हा परिषद चौकातील सिग्नल मात्र कायमच कोमात असतो. पोवई नाक्यावरील सिग्नल क्रॉस करण्यासाठी लोक अक्षरक्ष: जीवावर उदार होतात.

 पोवई नाक्यावरील झेब्रा क्राँसिंगही गायब झाले आहेत. सिग्नलच्या ठिकाणी  झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढर्‍या पट्ट्या आवश्यक असतानाही या पट्ट्या शहरात आता दिसेनाशा झाल्या आहेत. असेच प्रकार शहरातील अन्य वर्दळीच्या ठिकाणीही  पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत होत असून काहींना तर यासाठी दंडासही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकाकडून नाराजी व्यक्त होत आहे. सातार्‍यात राजवाडा, मोती चौक, शनिवार पेठ, पोवई नाका, एसटी स्टँड परिसर, विसावा नाका, गोडोली ही वर्दळीची ठिकाणी आहेत. पोवई नाक्यावरुन वाय.सी. कॉलेज रोडवर वाहनांची सतत येˆजा असते. त्यामुळे येथील सिग्नलच्या ठिकाणी पांढर्‍या पट्ट्या नसल्यामुळे अनेकांची फसगत झाल्यामुळे पोवई नाका परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.