Sun, May 19, 2019 22:59होमपेज › Satara › साताऱ्यात युवकांकडून गोळीबार; महिला गंभीर

साताऱ्यात युवकांकडून गोळीबार; महिला गंभीर

Published On: May 31 2018 6:29PM | Last Updated: May 31 2018 6:29PMसातारा : प्रतिनिधी

सातारा येथील बुधवार नाका परिसरात आज गुरूवारी दुपारी युवकामध्ये भांडणे झाली. या भांडणाचे पर्यवसन अचानक गोळीबारात झाल्‍याचे समोर आले आहे. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून, तीच्यावर उपचार सुरू आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, बुधवार नाका परिसरात युवकांमध्ये भांडणे सुरू असताना एकाने गोळीबार केला यात ती गोळी चुकून तेथे असलेल्‍या महिलेला लागली. यामध्ये संबंधीत महिला गंभीर जखमी झाली असून, जखमी महिलेला उपचारासाठी जिल्‍हा शासकीय रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेची माहिती मिळताचं सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार युवकांची भांडणे सुरू असतानाच महिलेला गोळी लागली आहे.अश्विनी शेखर कांबळे (वय 26, रा. बुधवार पेठ, सातारा) असे गंभीर जखमी झालेल्‍या महिलेचे नाव आहे. त्या दुकानामध्ये साहित्य खरेदी करत असताना त्यांना चुकून गोळी लागली आहे.दरम्यान, महिलेला सिव्हिलमध्ये आणल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. मात्र महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.