Wed, Apr 24, 2019 01:58होमपेज › Satara › मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत

मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 8:00PMतासवडे टोलनाका : प्रवीण माळी 

शेतीमधील काम करण्यासाठी मजूर अव्वाच्या सव्वा मजुरीची मागणी करत असून त्यामुळे शेतकरी अडचणी आला आहे. तर शेतीतील अनेक मशागतची कामे खोळंबली आहेत. त्यात शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य  हमीभाव मिळत नसल्यामुळे  शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी सर्वच शेतकरी याञिंक अवजारे खरेदी करू शकत नसल्याने दुहेरी संकट शेतकरी सापडल्याचे दिसून येत आहे. 

शेतीमधील कामासाठी शेतकर्‍यांना बारा महिने मजुरांची आवश्यकता असते. त्यामध्ये महिला व पुरूष मजुरांचाही समावेश असतो. ऊस पिकासाठी मजुरांना कमी प्रमाणात काम असते. परतुं सगळेच शेतकरी ऊस करत नाहीत तर काही शेतकरी वर्षातून दोन तीन पिके घेतात. त्यामध्ये टोमॅटो, वांगी, भात, गहू इत्यादीचा समावेश आहे. यामध्ये पिक लावणी, भागंलण, तोडणी, काढणी तसेच बांधणीसाठी  मजुरांची अत्यंत आवश्यकता असते.  शेतकर्‍याला शेती कामासाठी मजुरावरच अवलंबून राहावे लागते. त्यावेळी मजुर मजुरीपेक्षा जास्त पैसे मागतात किंवा काम करण्यास नकार देतात. मुळात भाजीपाला करत असताना त्याची मशागतची सर्व कामे वेळेत होणे आवश्यक असते, अन्यथा हातचे पिक जाऊ शकते. त्यामुळे शेतकर्‍याला  नाईलाजाने मजुरांच्या मागण्या मान्य कराव्या लागतात. ही सर्व जोखीम पत्करून शेतकरी पिक घेतो, परंतु बाजारभाव कधीच स्थिर नसतो. त्यामध्ये नेहमीच चढउतार होत असतो. गेल्या दोन महिन्यांपासून तर अनेक शेतमाल अत्यंत कवडीमोल दराने विकला जात आहे. काहीवेळा तर बाजारभाव इतका कोसळतो की शेती माल दोन-दोन दिवस विकला जात नाही. शेतकर्‍यांचे अर्थिक बजेट या पिकावरच अवलंबून असून त्यांनाच योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे कबंरडे मोडले आहे. 

मजुरांना पर्याय म्हणून शेती याञिंक अवजारेने करण्याचे आवाहन शासन करत आहे. परतुं याञिंक अवजारांच्या किमती जास्त आहेत. जे   शेतकरी सधन आहेत, ज्यांची अर्थिक स्थिती चागंली आहे, ते शेतकरी याञिंक अवजारे खरेदी करू शकतात. अशा शेतकर्‍यांची संख्या अल्प आहे. इतर बहुतांशी शेतकरी सर्वसामान्य आहेत. त्यांना सर्वस्वी मजुरावरच अवलंबून रहावे लागते. काही शेतकर्‍यांना तर दोन वेळच्या जेवनाची भ्रांता असते अशा वेळी ते यांत्रिक अवजारे कशी खरेदी करणार हा खरा प्रश्‍न आहे.