Mon, Nov 12, 2018 23:49होमपेज › Satara › साताऱ्यात महिलेचा खून

साताऱ्यात महिलेचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील तामजाईनगर येथे फ्लॉवर व्हॅली या अपार्टमेंटमध्ये लता बापूराव सावंत (वय 42) या महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने  खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या खूनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी, लता सावंत या प्लास्टीक कंपनीमध्ये कामाला असून तामजाईनगरमध्ये त्या मुलीसमवेत अपार्टमेंटच्या गाळ्यात राहतात. रविवारी दुपारी त्या एकट्याच घरी होत्या. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला. गंभीर हल्ला झाल्यानंतर त्या बाहेर आल्या व तेथेच कोसळल्या. काही जणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.