Mon, Mar 25, 2019 14:00होमपेज › Satara › सातारा : कार-टेंपोच्या  अपघातामध्ये  दोघे ठार

सातारा : कार-टेंपोच्या  अपघातामध्ये  दोघे ठार

Published On: Dec 08 2017 7:20PM | Last Updated: Dec 08 2017 7:19PM

बुकमार्क करा

शेंद्रे : वार्ताहर

वळसे, ता. सातारा अजिंक्यतारा सूतगिरणीसमोर कार व टेंपो अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार, तर  तीनजण जखमी झाले आहेत. 

पुण्याहून कार (क्र. एमएच १४ पीएक्स ८६५) कराडकडे चालली असताना पहाटे ५.३० वाजता वळसे हद्दीत आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी डिव्हायडर तोडून पलिकडील लेनवर जाऊन आयशर टेंपोवर (क्र. एमएच ११ एएल ६४०३) आदळल्याने टेंपोही सर्व्हीस रस्त्यावर जावून कोसळला. कार टेंपोवर आदळल्याने कारमधील अतुल अशोक जाधव (वय ३०) व मंदाकिनी अशोक जाधव (वय ५५) या मायलेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.