Tue, Jul 16, 2019 00:07होमपेज › Satara › वाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न 

वाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न 

Published On: Dec 01 2017 6:10PM | Last Updated: Dec 01 2017 6:17PM

बुकमार्क करा

वाई : प्रतिनिधी

शहरातील रविवार पेठ येथून क्लासवरून सायकलने घरी निघालेल्या अकरा वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मात्र या घटनेमुळे पालक व विद्यार्थी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

गणपती आळी येथील सहावीतील विद्यार्थी रविवार पेठेतून सायकलने घरी जात होता. यावेळी  काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या व्यक्तीने   मुलाच्या हाताला धरून बळजबरीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला.  यावेळी संबधित  मोटारसायकल स्वाराने तोंडाला मास्क बांधले होते. मात्र शाळकरी  मुलाने प्रसंगवधान दाखवत गाडीवर लाथ मारून तेथुन पळ काढला. त्यामुळे पुणे पासिंगच्या   मोटारसायकल स्वाराने तेथून पळ काढला. त्यानतंर मुलाने घरी आल्यानंतर सदर प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी या घटनेची माहिती वाई पोलिसांना दिली. घटनेचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.