Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Satara › सातारा : महामार्गालगत खोडशीनजीक एकाचा मृत्यू

सातारा : कराडजवळचा 'तो' खून नसून अकस्मात मृत्यू 

Published On: Apr 09 2018 11:20AM | Last Updated: Apr 09 2018 3:41PMकराड : प्रतिनिधी

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत पद्मा हॉटेलसमोर महामार्गालगतच्या नाल्यात सोमवारी मृतदेह आढळला. वहागाव (ता. कराड) येथील अशोक शामराव पवार (वय 48) यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. या प्रकरणात खून की मृत्यू यावरून संशय होता. मात्र, पोलिसांनी हा अकस्‍मात मृत्यू असल्याचे सांगितले.

अशोक पवार हे मुंबईत चालक म्हणून काम करत होते. वहागावची रविवारी व सोमवारी यात्रा होती. यात्रेनिमित्त अशोक पवार गावी आले होते. मात्र, रविवार सकाळपासून ते घरातून बेपत्ता होते. रविवारी नातेवाईकांनी त्यांचा शोधही घेतला, मात्र ते सापडले नव्हते. याच दरम्यान, महामार्गालगत खोडशी गावच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे समोर आले. 

याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीत वहागावलगतच्या घोणशी गावातील एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीने अशोक पवार यांना ओळखत घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. तसेच घटनेची माहिती मिळाल्याने कराड शहर पोलिसही घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, घटनास्थळी झटापट होऊन त्यात अशोक पवार यांचा खून झाला की काय?  असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र यात कोणताही घातपात नसून त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे