Fri, Jun 05, 2020 11:16होमपेज › Satara › लोकसभेवेळची शाई कवलाने घासून काढा

लोकसभेवेळची शाई कवलाने घासून काढा

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 02 2019 11:54PM
सातारा : प्रतिनिधी

स्व.यशवंतराव चव्हाण यांचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. शरद पवारांनी मनावर घेवून मला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट दिले. आताची निवडणूक उमेदवारांची नसून मतदारांची आहे. दुसर्‍या पार्टीचा कोण आहे हे बघायची गरज नाही. माझ्या गळ्यात घोंगडं घातलं ते निभवायचं काम तुमचे आहे. शरद पवारांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेवू, अशी सडेतोड भूमिका माजी राज्यपाल व सातारा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केली. दरम्यान, लोकसभेवेळी लागलेली आपल्या बोटाची शाई अद्यापही गेली नाही ती कवलाने घासून काढा नाहीतर तुम्हाला मतदान करावयास मिळणार नाही, अशी खोचक टिकाही त्?यांनी केली.

श्रीनिवास पाटील बुधवारी गांधी जयंतीदिनाच्या कार्यक्रमानिमित्त सातार्‍यात आले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. ते म्हणाले, सामाजिक भान ठेवून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा उभारू. शरद पवारांच्या  झालेल्या अपमानाचा बदला घेऊ. 

माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पाटील यांनी प्रचाराची रणनीती मला आखण्याची काही गरज नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले,  सातारच्या लोकांनीच माझ्या प्रचाराची रणनिती आखली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये एका बाजूने उमेदवार आहे. मात्र दुसर्‍?या बाजूने उमेदवार नसून जनता हीच उमेदवार आहेे. 

यामुळे सातार्‍यातील चित्र हे जनता विरुध्द उमेदवार असेच चित्र आहे. लोकांनी ठरवले आहे की सातारसारख्या सुप्रसिध्द, ऐतिहासिक शहराला वळण लागले पाहिजे. आतापर्यंत चिकटलेले हे दुर्गुण आहेत ते जावून आपल्या सातारचे नाव स्वातंत्र्यपूर्व काळात जसे संपूर्ण महाराष्ट्र व देशात गाजले होते तसेच ते पुन्हा नव्याने पुढे आले पाहिजे. स्व.यशवंतराव चव्?हाण यांचा वारसा चालवण्यासाठी मतदारराजा आता जागरुक झाला आहे. मतदारराजा ती परंपरा पुढे चालवेल, अशी मला खात्री असून मतदारांच्यावतीने मी ही उमेदवारी सवीकारली असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, याचवेळी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कशाकरता ही पोटनिवडणूक आहे हे लोकांनी विचारले  पाहिजे. तीन महिन्यातच निवडणूक घयावी लागली. इतका मोठा खर्च व मोठा त्रास प्रशासनालाही झाला आहे. विचार पटत नसतील तर सोडचिठ्ठी घेतलेली बरी, असे ते म्हणाले.