Fri, May 29, 2020 19:00होमपेज › Satara › 'काँग्रेस विचाराने उभा राहून ही निवडणूक लढवेल'

'काँग्रेस विचाराने उभा राहून ही निवडणूक लढवेल'

Published On: Oct 02 2019 7:15PM | Last Updated: Oct 02 2019 7:15PM
सातारा : प्रतिनिधी

आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, अर्थव्‍यवस्‍थेचे सुटलेले नियंत्रण, नोटबंदी, जीएसटीचा मोठा फटका  बसला असून अद्याप नागरिक यातून सावरलेले नाहीत. यामुळे काँग्रेस विचाराने उभा राहून ही निवडणूक लढवेल आणि यश मिळवेल असा आशावाद माजी मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.

सरकार रिझर्व्ह बँकेवर डल्‍ला मारून रडतखडत अर्थव्‍यवस्‍था चालवत आहे. भविष्‍य अत्‍यंत अंधारमय असून हे सरकार राहिले तर लोकांच्‍यासमोर काही पर्याय राहणार नाही. म्‍हणून अर्थव्‍यवस्‍था हा आमचा महत्‍वाचा मुद्दा आहे. देशात सौहार्दाचा मुद्दा महत्‍वाचा असून मॉब लिचींगच्‍या घटना समाजामध्‍ये तेढ निर्माण करत आहेत. 

विधानसभा व लोकसभा निवडणूकीचे मुद्दे एकच असणार आहेत. जनता आमच्या पाठिशी नक्कीच राहील पुन्हा सातारा जिल्ह्यात आघाडीला मोठ यश मिळणार आहे.