Fri, Jul 19, 2019 23:15होमपेज › Satara › फलटण : विडणीजवळ ट्रक पलटी होऊन दोघे जखमी

फलटण : विडणीजवळ ट्रक पलटी होऊन दोघे जखमी

Published On: Jan 27 2018 11:00AM | Last Updated: Jan 27 2018 11:00AMविडणी : वार्ताहर  

बंगळूरू येथून पुण्याकडे पीव्हीसी पाईप घेऊन निघालेला ट्रक विडणीजवळील राऊ- रामोशी पुलावरील वळणावर पलटी झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,   शनिवारी  सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाड - पंढरपूर महामार्गावर विडणीनजीक असणाऱ्या राऊ- रामोशीपुलाच्या वळणावर बंगळूरू येथून पीव्हीसी पाईप पंढरपूरमार्गे पुण्याकडे घेऊन निघालेला ट्रक (क्र. केए २८बी३६२८) हा वळणावर पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक चंद्रकांत तुकाराम हरजन( वय ४३, रा. चडचण ता. इंडी जि. विजापूर) व गणपत तुकाराम अहिवळे( वय २५ रा. कंचनाळ ता. इंडी जि. विजापूर) हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत.