Wed, May 22, 2019 10:21होमपेज › Satara › सातारा : वेळे येथे दूध टँकर-कारचा अपघात, कारचा चक्काचूर

सातारा : वेळे येथे दूध टँकर-कारचा अपघात, कारचा चक्काचूर

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 8:12PM

बुकमार्क करा
ओझर्डे : वार्ताहर

वेळे ता.वाई येथील हायवेलगत थांब्यानजीक दूध टँकर (एमएच ०९ सीयू ०३४४) व कार (एमएच १४ एफसी ४७५०) या वाहनांचा सायंकाळी अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने चालली होती. पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने अचानकपणे शेवटच्या लेनमधून पहिल्या लेनमध्ये वळण घेतले. या लेनमधून दूध टँकर चालला असताना कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार टँकरला धडकली.

कारमधून चार जण प्रवास करीत होते. या अपघातामध्ये कारचा चक्‍काचूर झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्‍थांच्या सहकार्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली.