Fri, Apr 26, 2019 17:58होमपेज › Satara › सातारा : वाठार स्टेशन येथे अपघातात एकजण जागीच ठार

सातारा : वाठार स्टेशन येथे अपघातात एकजण जागीच ठार

Published On: Jul 22 2018 4:26PM | Last Updated: Jul 22 2018 4:26PMसातारा : प्रतिनिधी 

रविवारी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन येथे लोणंद - सातारा रोडवर नागराज हॉटेलच्या समोर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यामध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, लोणंद - सातारा रोडवर नागराज हॉटेलच्या समोर मालट्रक RJ .07.GA. 1781 हा लोणंदच्या दिशेने चालला होता. चंद्रकांत शिवराम अहिरेकर यांची दुचाकी MH.11.S. 5640 यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये अहिरेकर हे ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरात समजताच मोठया प्रमाणावर गर्दी जमली. स.पो.नि. मारुती खेडकर यांना ही वार्ता समजताच त्यांनी वाठार पोलीस ठाण्याचे कर्मचारी लगेचच घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला व गर्दीवर नियंत्रण ठेवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपोडे बु ।। येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास स.पो.नि.मारुती खेडकर,पोलीस कर्मचारी कांबळे,धुमाळ,जगताप करत आहेत.