Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Satara › खा. उदयनराजेंकडून सातारा पालिकेचा आढावा

खा. उदयनराजेंकडून सातारा पालिकेचा आढावा

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:56PMसातारा : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कास तलाव उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, पोवईनाका ग्रेड सेपरेटर अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून साविआकडून लवकरच होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिका प्रशासनाची शुक्रवारी सकाळी बैठक घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, लेखापाल विवेक जाधव, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती स्नेहा नलवडे तसेच इतर खातेप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

बैठकीत सुरुवातीला खा. उदयनराजे यांनी शहरात सुरु असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. रखडलेल्या कामांबाबत अडीअडचणी समजून घेतल्या. त्याबाबत संबंधितांशी फोनवरुन संपर्क साधून सूचना केल्या.  शहरात सुरु असलेली विकासकामे तसेच आवश्यक निधीची माहितीही त्यांनी घेतली. शहरातील रस्ते, मटण मार्केट, शापिंग सेंटर्स, घरकूल योजनांची माहिती बांधकाम विभागाकडून घेतली. तसेच घनकचरा प्रकल्प, वाहन खरेदीबाबत आरोग्य अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान, करंजे एमआयडीसीतील जागाधारकांनी खा. उदयनराजेंची यावेळी भेट घेवून चर्चा केली. न.पा.ने संबंधितांना नोटीस पाठवली आहे. बर्‍याचजणांनी बेकायदेशीरपणे भूखंडांचे हस्तांतरण केल्याने यावर भूखंडधारकांनी पॉलिसी ठरवावी, अशी सूचनाही खा. उदयनराजेंनी यावेळी केली.