Tue, Jul 23, 2019 11:39होमपेज › Satara › सातारा : अपघातात महिला ठार

सातारा : अपघातात महिला ठार

Published On: Jun 27 2018 7:29PM | Last Updated: Jun 27 2018 7:29PMशिवथर: वार्ताहर

सातारा महामार्गावरील वाढे फाटा येथे बुधवारी सायंकाळी 6 वाजता ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात महिला जागीच ठार झाली. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून छाया कदम (रा.अनपटवाडी ता. कोरेगाव) या मुलासोबत साताराकडे येत होत्या. यावेळी दुचाकी वाढे फाटा येथे आल्यानंतर त्याचवेळी एक ट्रक लोणंदच्या दिशेने निघाला होता. या दरम्‍यान दुचाकीला ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील छाया कदम या खाली पडल्या यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली.  तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती समजताचं शहर पोलिसांनी अपघातस्‍थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.