Wed, Sep 19, 2018 09:14होमपेज › Satara › साताऱ्यात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

साताऱ्यात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

Published On: Mar 07 2018 4:34PM | Last Updated: Mar 07 2018 4:34PMसातारा : प्रतिनिधी

सातारा बसस्थानक परिसराच्या पाठीमागील बाजुस आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्‍याचे समोर आले आहे. सुदैवाने चोरट्यांच्या हाती रक्कम लागली नाही.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारा बस स्‍थानकाच्या पाठीमागील बाजूस आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे.  हा परिसर वर्दळीचा आणि नेहमी गजबजलेला असतो. असे असतानाही मंगळवारी मध्यरात्री मात्र चोरट्यांनी थेट एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना या एटीएममधुन रक्‍कम चोरता आली नाही. ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बँकेच्या कर्मचार्‍यांनी तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.