Mon, Apr 22, 2019 22:17होमपेज › Satara › सातार्‍यातील चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त

सातार्‍यातील चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त

Published On: Apr 13 2018 5:27PM | Last Updated: Apr 13 2018 5:27PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरातून तब्बल 9 दुचाकी चोरल्याप्रकरनी अभिजित उर्फ राहुल राजाराम लोहार रा. सोमवार पेठ, सातारा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. पोलिसांनी 2 लाख 82 हजार रूपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शहर परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले होते. या दुचाकी अभिजित लोहार याने चोरल्या असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कसोशाने त्‍याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून अधिक चौकशी केली असता, त्‍याने दुचाकी चोरीची कबुली दिली.

पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, रवींद्र वाघमारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.