Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Satara › चार तासात मंदिरातील चोरीचा लावला छडा

चार तासात मंदिरातील चोरीचा लावला छडा

Published On: Apr 16 2018 7:30PM | Last Updated: Apr 16 2018 7:30PMसातारा: प्रतिनिधी

पवारवाडी, ता. जावली येथे मंदिराची दानपेटी फोडून चोरी केल्याप्रकरणी जितेंद्र उर्फ गोट्या शिवाजी पवार व नंदू मुकेश भानसे उर्फ गोसावी या दोघांना अटक केली. दरम्यान, मेढा पोलिसांनी अवघ्या 4 तासात या गुन्ह्याचा छडा लावल्याने भक्तवर्गातून स्वागत होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 13  रोजी रात्री अज्ञात चोरट्याने पवारवाडी येथील किनाळीदेवीच्या मंदिरात चोरी केली होती. या मंदिरातील दानपेटीतून रोख 2 हजार 500 रूपये व देवीच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली माळ असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शंकर बाबुराव यांनी ढवळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मंदिरात पैसे व दागिने चोरी झाल्याने या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ञ तसेच एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. पोलिस तपास करत असतानाच संशयित दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्‍यांची चौकशी केली असता, दोघांनी चोरीची कबुली दिली.तसेच त्‍यांच्याकडून रोख रकमेपैकी 970 रूपये व सोन्याच्या मण्याची माळ पोलिसांनी जप्त केली. 

पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन माने, फौजदार सागर गवसणे, हवालदार नितीन पवार, अभिजीत सुतार, संजय शिर्के, नितेश कणाके, अमर जाधव, संजू काळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला अवघ्या 4 तासामध्ये या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्‍याने भक्‍तवर्गातुन पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.