Thu, May 23, 2019 15:03
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ढेबेवाडी : तेटमेवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

ढेबेवाडी : तेटमेवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Published On: Jan 07 2018 4:27PM | Last Updated: Jan 07 2018 4:27PM

बुकमार्क करा
तळमावले : वार्ताहर

तेटमेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथे शेतात चरत असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात एक शेळी भक्ष्यस्थानी पडली आहे.

शेतकरी उत्तम तुकाराम तेटमे हे त्यांच्या शेळ्या घेऊन शनिवारी शेतात गेले होते. त्यानंतर ते दुपारी ४ च्या सुमारास घरी परतत असताना आब्यांची वगळ परिसरात अचानकपणे बिबट्याने त्यांच्या शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक शेळी ठार झाली. सतत घराजवळच बिबट्या येत असल्याने तेटमेवाडीमध्ये अगोदरच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.