Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Satara › सातारा :  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान (video)

सातारा :  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान (video)

Published On: Jul 13 2018 5:02PM | Last Updated: Jul 13 2018 5:08PMलोणंद  : प्रतिनिधी

 माऊलीच्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज दुपारी दोनच्याच्या सुमारास निरा नदीच्या पात्रात अभ्यंगस्नान घालण्यात आले. पावसाची जोरदार सर आली, त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने जलधाराचा आभिषेक करीतच माऊलींचे निरा स्नान झाले. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकरी व भाविकांनी निरा नदीच्या दोन्ही तिराबरोबरच दोन्ही पुलावर मोठी गर्दी केली होती. 

पालखीचे सातारा जिल्‍ह्यात उत्‍साहात स्‍वागत

 ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करीत आळंदीहून पंढरीकडे विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे आज दुपारी दिडच्या सुमारास माऊलीच्या पालखी सोहळ्यास भव्य व विशाल रूप देणाऱ्या पुण्यवान हैबतबांबाची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 

निरा नदीच्या तिरावर दुपारच्यावेळी पालखीचा विसावा

माऊलीच्या पालखी सोळ्‍याने पुणे जिल्ह्यातील सात मुक्कामानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास वाल्हे येथुन प्रस्थान केले. पिंपरे बु. येथील न्याहरी ऊरकुन पालखी सोहळा निरा नदीच्या तिरावर दुपारच्या विसाव्यासाठी विसावला.पलीकडच्या तीरावर पुणे जिल्हा तर अलिकडच्या तिरावर सातारा जिल्हा अशा स्थितीत नदीच्या दोन्ही तीराबरोबरच निरा नदीच्या पात्रातही वारकरी व भाविकांची सकाळपासुनच गर्दी झाली होती.  दुपारी दिडच्या सुमारास माऊलीच्या पालखी सोहळ्याने निरा येथुन प्रस्थान केले.

निरा नदीत पालखी सोहळ्‍यासाठी सोडले विर धरणाचे पाणी

माऊलीच्या पादुकांना निरानदीवरील दत्त घाटावर निरा स्नान घालण्यासाठी रथातुन बाहेर काढुन पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे - पाटील आदीनी हातात घेतल्या. यावेळी नदीवरील पुल ते दत्त या मार्गावर मोठी गर्दी केली होती. निरा नदीत विर धरणातुन पाणी सोडण्यात आल्याने दत घाटावर माऊलीच्या पादुकांना माऊलीच्या जयघोषात निरा स्नानासाठी पादुकांना नेण्यात आले. 

पालखीसाठी शासनाकडून व्‍यवस्‍था

शासनातर्फे   तीर्थ क्षेत्र आराखड्यातुन माऊलींच्या स्नानासाठी घाटावर खास सोय करण्यात आली होती.  तर  सिमेंटचा रस्ता, घाटावर पायऱ्या आदी सुविधा केल्या आहेत. माऊलीच्या पादुकांना नियोजीत जागी स्नान न घालता गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही त्याच्‍या अलीकडे सुमारे वीस तीस फुट स्नान घालण्यासाठी पादुका निरा नदीच्या पात्रात नेण्यात आल्या.  यावेळी माऊलीचा जयघोष करण्यात आला.

पालखी सोहळ्‍यास मान्‍यवरांची उपस्‍थिती

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखी सोहळ्याने टोल नाक्याजवळ पाडेगाव ता. खंडाळा गावचे हद्दीत सातारा जिल्हयात प्रवेश केल्यानंतर जोरदार उत्साही वातावरणात पुष्पवृष्टि करून स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार मकरंद पाटील,जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , जिल्हा पोलीस प्रमुख संदिप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड , अविनाश शिंदे, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर , उपाध्यक्ष वंसतराव मानकुमरे , कृषि सभापती मनोज पवार, राजेश पवार , शिवाजी सर्वगौड, वनिता मोरे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन थाडे, शिवाजी विदयापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे, आदींनी स्वागत केली. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुककामी मार्गस्थ झाला.