होमपेज › Satara › आकर्षक चित्ररथांनी दिला शिवपराक्रमाला उजाळा

आकर्षक चित्ररथांनी दिला शिवपराक्रमाला उजाळा

Published On: Feb 19 2018 7:44PM | Last Updated: Feb 19 2018 7:44PMसातारा : पुढारी ऑनलाईन टीम 

शाही मिरवणुकीने सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या  मिरवणुकीत  फुलांनी सजवलेल्या चांदीच्या मानाच्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ मंडळाचे फेटाधारी युवक-युवती अश्वारूढ होवून सहभागी झाले होते. 

घोड्यावर स्वार झालेले मावळे व पारंपारिक वेशभुषा केलेल्या युवक-युवती मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या. सहावारी, नऊवारी साड्या परिधान केलेल्या युवतींचा सहभागही लक्षवेधक ठरला. शोभायात्रेतील श्रीपतराव पाटील हायस्कुल, करंजे', स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा - अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळा' नपा शाळा 13, 16, 17,, शिवपराक्रमावर चित्ररथ, अनंत इंग्लिश स्कूल, आधी लगीन कोंढयाण्याचे, जिजाऊ शाळा नं 23 या शाळांच्या चित्ररथांनी शिवपराक्रमाला नव्याने उजाळा दिला.