Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Satara › रस्त्यावरचं आमचं जगणं, कसं भरु लेकराचं वाडगं

रस्त्यावरचं आमचं जगणं, कसं भरु लेकराचं वाडगं

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 8:39PM

बुकमार्क करा
सातारा : सुशांत पाटील

सातार्‍यातील अनेक मार्गावर सध्या मूर्तिकारांचे बस्तान आहे. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून पोटापाण्यासाठी कडवा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला आहे. सणावारांच्या हंगामात कसेबसे दोन पैसे मिळतात न मिळतात तोच अतिक्रमणांचा वरंवटा फिरुन सगळंच पाण्यात जात आहे. 

सातार्‍यात पुणे—बेंगलोर महामार्गावर बाँम्बे रेस्टारंट येथे अनेक मूर्तीकार विविध मूर्ती बनवण्याचे काम करतात. मात्र  या मूर्तिकारांना रहायला घर नसल्यामुळे ते  उड्डाणपुलाच्या  खाली कादायकरित्या राहतात. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या जीवाची फिकीर न करता हे मूर्तीकार आपले मूर्ती बनवायचे कसब पणाला लावतात. थंडी, वारा, ऊन, पाऊस याची पर्वा न करता हे कलाकार आपल्या साराचा गाडा हाकत असतात. विविध आकर्षक मूर्त्या बनवून हे मूर्तीकार आपली रोजीरोटी भागवतात.  पण, आता यांत्रिक वस्तूंच्या अतिक्रमणामुळे या मूर्तीकारांना पूर्वीसारखे उत्पन्‍न मिळत नाही. त्यामुळे च्या वस्तूंची मागणी कमी होऊ लागली आहे. या सर्वावर मात करुन मूर्तीकार आपलं रस्त्यावरचं जगणं जगत आहेत. याचा शासनस्तरावरुन गांभीर्याने विचार होण्याची मागणी, मूर्तीकारांतून होत आहे.