Thu, Nov 15, 2018 20:08होमपेज › Satara › सातारा : काम रखडलेल्या रस्‍त्याचा झाला वाढदिवस (व्‍हिडिओ)

सातारा : काम रखडलेल्या रस्‍त्याचा झाला वाढदिवस (व्‍हिडिओ)

Published On: Jan 07 2018 7:57PM | Last Updated: Jan 07 2018 7:54PM

बुकमार्क करा
पुसेसावळी: वार्ताहर

सातारा-सांगली मार्गावरील पुसेसावळी ते गोरेगाव वांगी या रस्त्याच्या अपुऱ्या कामाला एक वर्ष पुर्ण झाले. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने या रस्त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. संबंधित यंत्रणेला जाग आणण्यासाठी हे पहिले पाऊल उचलल्याचे ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम यांनी यावेळी सांगितले.

पुसेसावळी गोरेगाव वांगी हा सुमारे सव्वा किलोमीटरचा रस्ता डिसेंबर २०१६ मध्ये सुरु करण्यात आला होता.त्यानंतर हे काम दिरंगाईने सुरु झाले.त्याच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या रस्त्यावर अंतिम डांबरीकरणीचा थर एक वर्ष पूर्ण झाले तरीही अद्याप टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाध्यक्ष विशाल कुंभार यांनी दिला आहे. 

यावेळी राजू कदम, कालिदास यादव, अमित पाटील, नितीन भोसले, कृष्णत कदम, निलेश शिंदे ग्रामस्थ व प्रवाशी उपस्थित होते.