Thu, Aug 22, 2019 08:13होमपेज › Satara › कराड : एप्रिलपासून बेकायदा रिक्षांवर हातोडा

कराड : एप्रिलपासून बेकायदा रिक्षांवर हातोडा

Published On: Jan 24 2018 3:58PM | Last Updated: Jan 24 2018 3:58PMकराड : प्रतिनिधी 

31 मार्चपर्यंत रिक्षा आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून ज्या रिक्षा चालकांकडे योग्य ती कागदपत्रे नसतील आणि यापूर्वीच स्क्रॅपमध्ये काढलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत शिंदे यांनी ही माहिती दिली. निळकंठ पाटील यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कराड शहरासह परिसरातील बेकायदा रिक्षांबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना 31 मार्चपर्यंत नोंदणी न झालेल्या रिक्षांवर कारवाई होणारच असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय शाळांना सुट्टी लागल्यानंतर स्कूल बसची तपासणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. गेल्यावर्षी वाहतुकीस अयोग्य असणाऱ्या दहा स्कूल बसचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.