होमपेज › Satara › सुट्ट्यांचा विकेण्ड; सातार्‍याजवळ वाहतूक कोंडी(व्‍हिडिओ)

सुट्ट्यांचा विकेण्ड; सातार्‍याजवळ वाहतूक कोंडी(व्‍हिडिओ)

Published On: Dec 23 2017 11:53AM | Last Updated: Dec 23 2017 11:53AM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी 

शनिवार रविवार आणि नाताळ या सलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा  शिवापूर, आनेवाडी टोलनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. या वाहनांमुळे महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती. 

सलग दोन दिवस या महामार्गावर ही वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर येथील पर्यटक थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी  घाटमाथ्याजवळ व इतर ठिकाणी जाण्यास पसंती देतात. पर्यटकांची संख्या वाढल्‍याने परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला. पुणे-बंगळूर द्रुतगती महार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. तर खंबाटकी घाटातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे १० मिनिटात पार होणारा खंबाटकी  घाट पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास मोजावे लागत होते.

शिवाय, नववर्ष स्वागताला गोव्याकडे जाणा-या प्रवाशांचीही मोठी गर्दी असल्याने सातारा ते कोल्हापूर मार्गे गोवा  या महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.