Wed, Aug 21, 2019 02:19होमपेज › Satara › आज वर्धापन दिन : वाचकांची उत्कंठा : व्हीजन इंडिया विशेषांक

नववर्षाची पहिली सायंकाळ ‘पुढारी’ सोबत

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:42PM

बुकमार्क करा
सातारा / कराड : प्रतिनिधी  

सातारा जिल्ह्यातील तमाम वाचकांचे हृदयसम्राट वृत्तपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रांवर निर्विवादपणे, निडरपणे आपला प्रभाव सिध्द केलेल्या सर्वाधिक खपाच्या प्रथम क्रमांकाच्या दै. ‘पुढारी’चा वर्धापनदिन सोमवार, दि. 1 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सोमवारपासून ‘व्हीजन न्यू इंडिया’ विशेषांक प्रसिद्ध होणार असून वर्धापनदिन सोहळ्यासाठी हॉटेल लेक व्ह्यू लॉन व कराड येथील हॉटेल थाट बाटचा सेंटर कोर्ट हॉल सज्ज झाले आहे. या दोन्ही सोहळ्यांची प्रचंड उत्सुकता जिल्हावासीयांना लागून राहिली असून टीम ‘पुढारी’सह तमाम वाचकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

दै.‘पुढारी’ने गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, कृषि, सहकार, ग्रामविकास, वैद्यकीय, प्रशासकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव कायम ठेवला आहे. ‘पुढारी’चा वर्धापनदिन व नव्या वर्षाची सुरुवात या परंपरेशी जिल्हावासीयांचे नाते अगदी घट्ट विणले आहे. यंदाही हे ऋणानुबंध आणखी गडद होणार आहेत.

यंदा सातारचा वर्धापनदिन सोहळा हॉटेल लेक व्ह्यू लॉनवर सोमवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत तर  कराडचा सोहळा बसस्थानकाशेजारी हॉटेल ‘थाट-बाट’ इमारतीमधील सेंटर कोर्ट हॉलमध्ये सायंकाळी 5.30 ते 9 या वेळेत होणार आहे. यावेळी वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतकांचा स्नेहमेळावाही आयोजित केला आहे.  या दोन्ही सोहळ्यांची जिल्हावासीयांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. 

‘व्हीजन न्यू इंडिया’ हा प्रमुख विषय घेवून आलेल्या यंदाच्या विशेषांकात विविध क्षेत्रातील बदलाचा आढावा घेण्यात आला आहे. विशेषांकांमध्ये विविध विषयांतील तज्ञ व अभ्यासकांच्या माहितीपूर्ण लेखांसह जिल्ह्याची वैशिष्टे, समृध्द वारसा, पर्यटनाचा बदलता लूक आदी संग्राह्य व परिपूर्ण माहिती अन् लेखांचा खजाना वाचकांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर विविध खात्यांचे मंत्री व नामवंत तज्ञांचे लेख असणार आहेत. राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी आणि पदाधिकारी यांनीही या विशेषांकासाठी आवर्जून लेखन केले आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सहकार, कृषि, अर्थकारण, पर्यावरण अशा विविध विषयांवर असलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचाही समावेश आहे. या विशेषांकाबाबत कुतूहलाचे वातावरण असून जिल्हावासीयांना  या विशेषांकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  दि. 1 जानेवारीपासून हे  विशेषांक प्रकाशित होणार असल्याने वाचक व जाहिरातदारांसाठी वर्धापनदिनाची पर्वणी मिळणार आहे.

जाहिरातीसाठी अखंडित ओघ सुरुच...

महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देणार्‍या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी, संस्थांनी, उद्योगसमुहांनी आपला सहभाग विशेषांकांत नोंदवण्याची इच्छा व्यक्त करुन शुभेच्छा जाहिरातींद्वारे या विशेषांकात आपले स्थान पक्के केले आहे. ‘पुढारीत जाहिरात अन् ग्राहकच दारात’, असा  अनुभव व्यवसायिक गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत. म्हणूनच जाहिरातींसाठीही ‘पुढारी’कडे मोठा ओघ सुरु आहे. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, संस्थाजनक, सहकार, वैद्यकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सातारा जिल्ह्याला व्यापून टाकलेल्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापनदिनाच्या विशेषांकात जाहिरात सहभाग नोंदवून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची संधी सोडू नये, असे आवाहन ‘टीम पुढारी’ने केले आहे.