Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Satara › पोलिसांची हप्तेगिरी कॅमेर्‍यात कैद(व्हिडिओ)

सातारा : पोलिसांची हप्तेगिरी कॅमेर्‍यात कैद(व्हिडिओ)

Published On: Jan 20 2018 7:05PM | Last Updated: Jan 20 2018 7:07PMसातारा : प्रतिनिधी  

रहिमतपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याने ट्रकचालकाकडून  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून हप्ता उकळला. याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण जिल्हा पोलिस प्रमुखांना सादर करण्यात आले असून, हप्तेखोर पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे पोलिस दलातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली असून, पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.  

याबाबत अधिक महिती अशी, रहिमतपूर पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस वाहनचालक चव्हाण (बक्कल नं 2475) हे संबंधित व्हिडिओ क्लिपमध्ये पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबत रोहन दिलीप पवार (रा. रहिमतपूर) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील व दैनिक ‘पुढारी’कडे धाव घेवून न्यायाची मागणी केली आहे. संबंधित व्हिडिओ क्लिपही  सादर करण्यात आली आहे. 

रहिमतपूर येथील रोहन दिलीप पवार यांचा माल वाहक ट्रक आहे. त्यांना रहिमतपूर पोलिस ठाण्यात पोलिस गाडीवर चालक असणारे चव्हाण यांनी वारंवार  खोट्या गुन्ह्यात तुझी गाडी अडकवीन  आशी धमकी देवून दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या  पवार यांनी तक्रार देण्यासाठी १६ जानेवारी रोपी दुपारी एक वाजता मित्र रणजीत माने यांच्यासह सातारा येथील लाचलुचपत  प्रतिबंधक कार्यालय गाठले.  मात्र, तेथील वरिष्ठ अधिकारी कुरुळे परगावी  मीटिंगला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर कार्यालय कर्मचारी माने मॅडम यांनी कार्यालयीन दुरध्वनीवरुन कुरुळे यांच्याशी संवाद साधून दिला. यावेळी  त्यांना सर्व हकिकत व तक्रार कथन केली. त्यावर कुरुळे यांनी संबंधित व्यक्तीकडे तक्रारकर्त्याचे शासकीय काम प्रलंबित असल्यास आम्ही ट्रॅप करु शकतो, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार मित्रासह परत रहिमतपूरला आले. सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान रहिमतपूर ते ब्रम्हपुरीरोड येथे वाहनचालक चव्हाण शासकीय वाहनासह आले. त्यांनी मित्र प्रदिप चव्हाण यांच्या समोरच दोन हजार रुपये घेतले. यावेळी सुरु असणार्‍या देवाण-घेवाणीचे मोबाईलवर व्हिडिओ  चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलिस वाहनचालक चव्हाण रंगेहाथ लाचेची रक्कम घेत असल्याने चव्हाणवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन तत्काळ त्याचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी रोहन पवार यांनी केली आहे.