Tue, Jan 22, 2019 21:09होमपेज › Satara › साताऱ्यात लॉजवर पोलिसांचे छापासत्र

साताऱ्यात लॉजवर पोलिसांचे छापासत्र

Published On: Aug 05 2018 10:59PM | Last Updated: Aug 05 2018 10:59PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लॉजवर डीवायएसपी गजानन राजमाने यांच्या पथकाने छापा टाकला असून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार त्याठिकाणी काही महिला व पुरुषांना पकडण्यात आले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, साताऱ्यात लॉजमध्ये गैरप्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी रात्री पोलिसांचे एक पथक लॉजमध्ये गेले. सुरुवातीला रजिस्टर तपासण्यासाठी सुरुवात केली. लॉजची पाहणी केली असता त्यामध्ये दोन महिला व पुरुष आढळून आले आहेत. त्यांनी योग्य ती माहिती न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.