Fri, Jan 18, 2019 03:05होमपेज › Satara › वादळी वार्‍यात फलटणमध्ये महिला ठार (video)

वादळी वार्‍यात फलटणमध्ये महिला ठार (video)

Published On: May 28 2018 12:07PM | Last Updated: May 28 2018 12:23PMफलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यात रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातिल वीज, पाणी, दूरध्वनि सेवा कोलंमडून पडली आहे. मोठमोठी झाडे उलमळून पडल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाली आहे. झिरपवाडी (ता. फलटण) येथे महिलेच्या अंगावर भिंत पडून महिला ठार झाली आहे, तर सोनवडी बुद्र्क येथे दोघे जखमी झाले आहेत.फलटण ते पंढरपूर मार्ग बंद पडला आहे. 

बऱ्याच दिवसांपासून फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्मा जाणवत होता. वळीवाच्या पावसाने हुलकावनी दिली होती. रविवारी रात्री पाऊस पडणार अशी अटकळ जाणवत असतानाच ९:३० वाजता जोरदार तूफानी वाऱ्यासह पावसाला  सुरुवात झाली. बरड, विडनी, राजाळे, गिरवी, निरगुडी, ठाकुरकी, जाधववाड़ी, कोळकी, गोखळी, भागातील अनेक गावांना वादळ वाऱ्याने आणि पावसाने झोडपून काढले आहे. अनेकांच्या घरांची पत्रे उडून गेली आहेत. भिंती पडल्या आहेत. शहरात अनेक झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्यांचेही पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील वीज बंद आहे. वीज मंडळचेही लाखो रूपयांचे नुक्सान झाले. यामुळे शहरातील पाणी, फोन सेवा बंद आहे. नगरपालिकेने आपत्‍कालीन बैठक बोलविली असून सकाळपासून नगराध्यक्षा निता नेवसे, राष्टवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी शहरातील नुकसानीची पाहणी केली. तसेच मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, तहसीलदार विजय पाटील यांनी ग्रामीण भागातील नुकसानीची पाहणी केली. या मध्ये शहरातील तीसहून अधिक घरांचे, दुकानांचे पत्रे उडून गेले. पाऊस कमी आणि वादळवारे जास्त असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले  शेती व घर मालमत्तांचे नुकसान झाले.

फलटण कोळकी.विडणी.जाधववाडी निरगुडी धुळदेव अलगुडेवाडी या परिसरात घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.