Wed, Apr 24, 2019 19:41होमपेज › Satara › महामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुटले

महामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुटले

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:50PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

महामार्गावरील खिंडवाडी, ता. सातारा येथे प्रवाशाची लुटमार करून त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल असा ऐवज व्हॅनमधून आलेल्या अनोळखी चौघांनी जबरदस्तीने चोरून नेला. दरम्यान, मारहाण केल्यानंतर जखमीला बांधून नाल्यात फेकल्याचेही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

शंकर बाळू जाधव (वय 65, रा.भाटमरळी, ता. सातारा) असे जखमीचे नाव असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर जाधव यांचा बैल व भाजी व्रिकीचा व्यवसाय आहे. मंगळवारी ते व्यवसायाच्या निमित्ताने आरफळ, ता. सातारा येथे आले होते. काम न झाल्याने ते तसेच पुन्हा जाण्यासाठी निघाले. बॉम्बे रेस्टॉरंट येथे आल्यानंतर त्यांना पांढर्‍या रंगाच्या व्हॅनने लिफ्ट दिली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास व्हॅनमध्ये चौघे व तक्रारदार शंकर जाधव असे पाच जण होते. व्हॅन खिंडवाडीच्या अलीकडे आल्यानंतर खाणीलगत नेण्यात आली. यावेळी संशयितांनी जाधव यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडून त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर संशयितांनी जाधव यांना बांधले व जाताना नाल्यामध्ये फेकून देऊन व्हॅनसह पोबारा केला.