Thu, Nov 15, 2018 09:30



होमपेज › Satara › सातारा : बोरणे येथे एस.टी.चा अपघात 

सातारा : बोरणे येथे एस.टी.चा अपघात 

Published On: Mar 04 2018 6:00PM | Last Updated: Mar 04 2018 6:00PM



परळी : वार्ताहर 

बोरणे ता. सातारा येथे एस.टी. बसचा आज दुपारी अपघात झाला. या अपघातात चौदा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

बोरणे येथील एसटीचा अपघात झाल्‍याचे लक्षात येताच, स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्‍थळी धाव घेत, मदतकार्य सुरू केले. यावेळी सर्व प्रवाशांना ग्रामस्‍थांनी  एसटीतून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातातील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, जखमी प्रवाशांना सातार्‍यातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.