Mon, Sep 24, 2018 09:29होमपेज › Satara › पळशीत महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

पळशीत महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

Published On: Apr 13 2018 3:57PM | Last Updated: Apr 13 2018 3:57PMपळशी : वार्ताहर

रूई ता. कोरेगाव येथे विहिरीत पडून कृष्णाबाई भिकू माळी (वय ७८) यांचा मृत्यू झाला. शेतात पीकांना पाणी पाजण्यासाठी त्‍या आपल्‍या सुनेबरोबर गेल्‍या असता रात्री अंधारात त्‍या विहिरीत पडल्‍या.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रूई ता. कोरेगाव येथील कृष्णाबाई भिकू माळी (वय ७८) या आपली सून मनिषा व नातू सोन्या यांच्या बरोबर सोळा बिगा नावाच्या शेतात पीकांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. पाणी पाजण्यास उशीर होत असल्याने कृष्णाबाईंना अंधारात दिसत नसल्याने त्यांची सून मनिषा हिने आपल्या सासुला घरी जाण्यास सांगीतले. मात्र घरी न जाता कृष्णाबाई या शेतातच काम करत थांबल्या. सुन मनिषा व नातू शेतातून पाणी पाजुन घरी आल्यानंतर त्यांना कृष्णाबाई घरी आलेल्या दिसल्या नाहीत. मनिषा यांनी सासुबाई अजुन घरी आल्या नसल्याचे कामावरून आलेले पती नेताजीला सांगीतले. त्यांनी रात्रभर कृष्णाबाई यांचा शोध घेतला. परंतू त्या कोठेही आढळून आल्या नाही. त्यांनी पुन्हा सकाळी शोध घेण्यास सुरवात केली. त्या वेळी त्यांना कुंभार मळा नावाच्या शिवारात नारायण कुंभार यांच्या विहिरीत कृष्‍णाबाई या मृत अवस्थेत आढळून आल्या.