Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Satara › विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

Published On: Apr 13 2018 5:19PM | Last Updated: Apr 13 2018 5:19PMपळशी : वार्ताहर

बोधेवाडी (चिमणगाव) ता. कोरेगाव येथे सार्वजनीक पाणी पुरवठ्‍याच्या विहिरीवर वेल्डींग चे काम करत असताना आसरे ता. कोरेगाव येथील अभयसिंह मधुकर अवघडे (वय २४) या मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बोधेवाडी (चिमणगाव) ता. कोरेगाव येथे तीळगंगा नदीच्या काठा लगत असणाऱ्या गावठाण नं. ३० मधे गावाला पाणी पुरवठा करणारी सार्वजनीक विहिर आहे. त्या विहिरीला सुरक्षा जाळी बसवण्याचे काम गेल्‍या चार-पाच दिवसा पासुन रात्रं-दिवस सुरू आहे. तेथे चार ते पाच मजुर काम करत होते. मध्यरात्री १२:३० च्या सुमारास वेल्डींगचे काम करत असलेला कामगार अभयसिंह मधुकर अवघडे रा. आसरे ता. कोरेगाव याचा तोल जावून तो विहिरीत पडला. यानंतर तो पोहून वर येईल म्‍हणून सहकाऱ्यांनी त्‍याची विहिरीतून बाहेर येण्याची वाट पाहिली. परंतू बराच वेळ तो बाहेर येत नसल्याने सहकार्‍यांनी गावातील लोकांशी संपर्क साधला. मधुकरचा शोध लागत नसल्‍याने विहिरीतील सर्व पाणी उपसण्यात आले. यानंतर मधुकरचा मृतदेह सापडला.