Sat, May 30, 2020 11:57होमपेज › Satara › नोकरांनी चेक चोरून दीड लाख वटवले

नोकरांनी चेक चोरून दीड लाख वटवले

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:46PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

वर्कशॉपमध्ये काम करत असणार्‍या दोन नोकरांनी मालकाचे चार चेक चोरून त्याद्वारे बोगस सह्या करून तब्बल 1 लाख 60 हजार रुपये बँकेतून लांबवले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. अमोल कृष्णा सावंत (वय 24, रा. लिंब) व विद्याधर सूर्यकांत शहा (वय 21, रा. वर्णे, दोघे ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, गणपत जाधव (रा. सदरबझार) यांचे इंजिनीअर नावाचे वर्कशॉप असून, त्यामध्ये संशयित दोघे ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. वर्कशॉपमध्ये जाधव यांचे बँकेचे चेकबुक होते. यातील चार चेक संशयित दोघांनी चोरून त्यावर बोगस सह्या केल्या व ते चेक वटवले. 1 लाख 60 हजार रुपये काढून जाधव यांची फसवणूक     

झाल्याने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेबाबतची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. एलसीबीने दोघांना पुढील तपासासाठी शहर पोलिसांकडे वर्ग केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय शिर्के, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश काटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.