Sat, Feb 23, 2019 17:15होमपेज › Satara › उसाच्या फडात ट्रॅक्टरखाली चिमुरडी चिरडली

उसाच्या फडात ट्रॅक्टरखाली चिमुरडी चिरडली

Published On: Dec 19 2017 7:42PM | Last Updated: Dec 19 2017 7:41PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

ऊस तोड मजुराच्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरडीच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने ती जागीच ठार झाली. आरफळ, (ता. सातारा) येथील उसाच्या फडात ही दुर्घटना घडली. अक्षदा लहू धोत्रे असे या चिमुरडीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, लहू धोत्रे हे जालना जिल्ह्यातील असून, ते उसतोड कामगार आहेत. पत्नी, मुलांसह  पाटखळ येथे उसतोडीसाठी थांबलेले आहेत. मंगळवारी आरफळ येथे उसाच्या फडात तोड सुरू होती. यावेळी अक्षदा  शेतातच झोपली होती. त्याचवेळी ट्रॅक्टर ऊस नेण्यासाठी वळवला जात असताना ट्रॅक्टरचे चाक अक्षदाच्या अंगावरुन गेले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.