Wed, Apr 24, 2019 11:45होमपेज › Satara › निकमवाडीचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांसाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन 

निकमवाडीचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांसाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन 

Published On: Jun 18 2018 3:50PM | Last Updated: Jun 18 2018 3:50PMभुईंज : वार्ताहर

निकमवाडी, ता. वाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांची बदली करू नये या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले. यावेळी शिक्षकांची बदली करायची असेल तर शाळाच बंद करा असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

निकमवाडी येथील शिक्षक गणेश लोकरे आणि धनवंती कांबळे यांची २००७ मध्ये वाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बदली झाली होती. त्यानंतर या दोघांनी गेल्या १० वर्षात शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचा नाव लौकिक वाढवला.  तसेच शाळेची गुणवत्ता वाढल्याने ५५ असणारा पट आता १५२ वर गेला आहे. या दोन शिक्षकांमुळेच शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक बँकेच्या सदस्यांनी शाळेची पाहणी करून कौतुक केले होते.

मात्र, काही दिवसांपूर्वी लोकरे आणि कांबळे या शिक्षकांची ऑनलाईन बदली झाली. त्यांनी केलेल्या कामामुळेच शाळा नीट सुरू आहेत. त्यांची आता बदली झाल्यानंतर पटसंख्या कमी होईल तसेच गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. यासाठी ग्रामस्थांनी सकाळपासून शाळेसमोर ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांनी केलेल्या या आंदोलनामुळे उदभवल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.

देशभरात नावलौकिक आणि आदर्श ठरणारी निकमवाडी (तालुका वाई) येथील प्राथमिक शाळा शिक्षकांची बदली रोखण्यासाठी निकमवाडी गावासह वाई तालुका एकवटला आहे. सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासून निकमवाडी ग्रामस्थांनी या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयास किकली जांब या गावातून पाठिंबा मिळत असतांना संपूर्ण वाई तालुक्यातील सेवाभावी संस्था आणि जाणकारांनी  पाठिंबा दिला आहे.